विदर्भात केला जाणारा हा एक खास प्रकार. लग्नकार्यात, सणावाराला ही भाजी केली जाते. लग्नात आचारी करतात तेव्हा यात प्रचंड तेल असते, जे मी बरेच कमी घेतले आहे. पण तरीही नेहमीच्या भाज्यांपेक्षा तेल जास्तच हवं, तरच खरा फील येतो. या भाजीचेही बरेच व्हेरिएशन्स आहेत. जर घरातले कुलाचार किंवा काही धार्मिक कार्याच्या दिवशी घरी केली, तर फक्त लसूण यातून वगळला जातो, बाकी वेळा लसूण घालूनही केली जाते. लाल भोपळा अजिबात न आवडणाऱ्या व्यक्तींनाही ही भाजी हमखास आवडते असा अनुभव आहे. तेव्हा अवश्य करून बघा.
साहित्य -
लाल भोपळा चिरून - २ वाट्या (शक्यतोवर सालासहित घेतात, मी मात्र साले काढली आहेत)
सुके खोबरे - पाव वाटी
खसखस - पाव वाटी
तेल - अर्धी वाटी
कढीपत्ता - १०-१२ पानं
चिंचेचा कोळ - २-३ टेबलस्पून
गूळ - २-३ टेबलस्पून
हळद - १ छोटा चमचा
तिखट- ३ छोटे चमचे
आलं किसून - २ टेबलस्पून
हिरवी मिरची बारीक वाटून/चिरून
मीठ - चवीनुसार
कोथिंबीर
कृती
खोबरं आणि खसखस वेगवेगळं भाजून घ्या आणि नंतर कोरडंच वाटून घ्या.
तेल गरम करा. तेल तापले की मोहरी, हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता घाला, आलं किसून यातच घाला, म्हणजे स्वाद जास्त छान येतो. आता यात वाटलेले खोबरं खसखस घाला. भरपूर परता. तेल सुटायला लागले की मग हळद, तिखट घाला. लाल भोपळ्याच्या फोडी घाला, चिंच गुळ घालून झाकण ठेवा. भाजी शिजत आली की मीठ घाला, वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
तळटीप -
१. हवा असल्यास दाण्याचा कूटही घालू शकता पण खोबरं-खसखस हे वाटण पुरेसं आहे.
२. ही भाजी जेवढी मुरते, तेवढी अजून छान लागते. त्यामुळे थोडीशी मुद्दाम बाजूला ठेवा आणि दुसऱ्या दिवशी खा.

No comments:
Post a Comment