Sunday, 14 January 2024

Zucchini-Lemon Cake - झुकिनी लेमन केक

झुकिनी केक बद्दल पहिल्यांदा एका पुस्तकात वाचलं, तेव्हा झुकिनी आणि ती पण केक मध्ये हे कॉम्बिनेशन बघून नवल वाटलं होतं. गेल्या आठवड्यात भाजी साठी म्हणून आणलेली झुकिनी काही कारणाने वापरली गेली नाही. म्हणून आज या केक ची आठवण आली आणि झुकिनी सत्कारणी लावली. मूळ रेसिपी पेक्षा काही बदल केले आहेत. 

साहित्य 

  • २५० ग्रॅम झुकिनी (साधारण १ मोठी झुकीनी)
  • २५० ग्रॅम साखर
  • २०० ग्रॅम मैदा आणि ५० ग्रॅम कॉर्नस्टार्च (हे मूळ रेसिपीत असलेलं प्रमाण - आज बदल करून मी १८० ग्रॅम spelt flour आणि ६० ग्रॅम ओट्स पावडर असं वापरलं. spelt flour कन्सिस्टन्सी होल व्हीट फ्लावर / कणिक यासारखी असते, मैद्यापेक्षा जड असतो जरा, त्याप्रमाणे बदल केले)
  • १ टीस्पून बेकिंग पावडर
  • १ टीस्पून बेकिंग सोडा
  • १५० ग्रॅम बटर (रूम टेम्परेचरला असलेले)
  • २५० ग्रॅम साखर 
  • ८० ग्रॅम घट्ट दही
  • ४ अंडी
  • एका लिंबाची साले किसून 
  • ६० मिली लिंबाचा रस 
  • चिमूटभर मीठ 

कृती 

झुकिनी धुवून किसून घ्या, त्यात किंचित मीठ घालून बाजूला ठेवा. (किसण्या ऐवजी मी चॉपर मधून काढली. तेही चालेल) 

ओव्हन १६० डिग्री ला प्रीहीट करायला ठेवा.  केकच्या भांड्याला बटर लावून घ्या.

कोरडे घटक म्हणजे मैदा / स्टार्च / कणिक, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, चिमूटभर मीठ हे एकत्र करून चाळून घ्या. 

बटर आणि साखर एकत्र करून हॅन्ड मिक्सर किंवा बीटर ने मिक्स करून घ्या. एकेक करून अंडी मिक्स करा आणि बीट करून घ्या. आता त्यात लिंबाचा रस आणि किसलेली लिंबाची साल घाला. दही घाला आणि पुन्हा सगळं मिक्स करा. 

आता चालून घेतलेले कोरडे घटक यात मिसळून घ्या. 

झुकिनी कापडी टॉवेलने टिपून घ्या, जास्तीचे पाणी काढून टाका आणि मिसळा. आता हे सगळं मिसळून घ्या. 

प्रीहीट केलेल्या ओव्हन मध्ये ५० मिनिटे ते १ तास बेक करा. टूथपिक ने पूर्ण बेक झाला आहे का हे चेक करून बाहेर काढा. गार होऊ द्या. 

मी २८ cm चा लोफ पॅन वापरला, त्यासाठी हे मिश्रण मला जरा जास्त वाटले. (केक चांगला झालाच) त्या ऐवजी लहान साईज असेल तर शक्यतोवर दोन लोफ पॅन लागतील किंवा २४-२६ cm डायमीटर असलेले गोल भांडे पण पण चालेल.






No comments:

Post a Comment