मशरूम मसाला
साहित्य:
मशरूम २५० ग्रॅम
एक मध्यम आकाराचा कांदा
अर्धा टोमॅटो (लहान असेल तर एक पूर्ण घ्या)
जिरे - १ लहान चमचा
हळद - १ लहान चमचा
तिखट - १ लहान चमचा
धणे पूड - अर्धा लहान चमचा
किचन किंग मसाला - १ लहान चमचा
मीठ चवीनुसार
ग्रीक योगर्ट किंवा घट्ट दही - २ ते ३ चमचे
बटर - ३ चमचे
साखर - चिमुटभर (मी वापरली नाही कारण दही अजिबात आंबट नसतं, उलट किंचित गोडसर चव असते मूळची, तेवढी पुरे वाटली मला, पण दही आंबट असेल तर किंवा तुम्हाला आवडत असेल तर चिमुटभर साखर घेऊ शकता)
कोथिंबीर सजावटीसाठी
कृती:
एका पसरट पॅन मध्ये बटर घेऊन ते वितळले की जिरे आणि कांदा परतून घ्या. मग टोमॅटो आणि मसाल्याचे इतर घटक आणि मीठ घालून परता. झाकण ठेवून शिजू द्या. आता मशरूम घालून सगळं मिसळून घ्या आणि पाच मिनिट ठेवा. गॅस बंद करा, घट्ट दही किंवा ग्रीक योगर्ट घालून सगळं मिसळून घ्या. पॅनची उष्णता पुरेशी होते या स्टेप साठी. नंतर कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
मशरूमचा झटपट होणारा हा आवडता प्रकार. याआधी जर्मनीत ख्रिसमस मार्केट मध्ये मिळणाऱ्या मशरूमची पाककृती लिहिली होती. त्यावरून दही वापरून बघितलं आणि मसाल्याचे प्रयोग करताना, किचन किंग मसाला मशरूम सोबत जास्त आवडला. गरम पोळी सोबत मला हा प्रकार आवडतो. ब्रेड पण चालतो. यावेळी bagettue सोबत प्रयोग केला, तो पण आवडला.
No comments:
Post a Comment